औरंगाबाद: “काम करून करून ज्याच्या हाताला पडतात घट्टे, त्यालाच देव भेटे ” हेच बहिणाबाईंचे तत्वज्ञान असल्याचे मनोगत ख्यातकीर्त कवी इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले. बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त एमजीएम विद्यापीठ आयोजित ‘मन वढाय वढाय…!’ या विशेष संगीत मैफिलीत ते यावेळी बोलत होते. काल सायंकाळी सात वाजता रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अनुराधाताई कदम आणि अंकुशराव कदम यांच्या हस्ते ‘जात्यावर दळून’ करण्यात आले.
मोफत रेशनबाबतचा नवीन नियम देशभर लागू! सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा
बहिणाबाई चौधरींच्या कवितेतील ‘जातं’ हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. संत जनाबाई आणि कबीर यांचे जीवनवादी तत्वज्ञान, निरक्षर बहिणाबाईंनी अक्षर वागमय करून त्यांच्या कवितेत मांडले. “अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी तस तस माझ गाणं पोटातून येते ओठी” कवितेबद्दलचं हे जीवनवादी उत्तर बहिणाबाईं आपल्याला सांगून गेल्या. आजची ही विशेष संगीत मैफिल बहिणाबाईंच मोठेपण सिध्द करणारी आहे. या निमित्ताने शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचेही भालेराव यांनी सांगितले.
दरोड्याच्या गुन्ह्यांत श्रीगोंद्यातील एका तरुणाला अटक; वाचा सविस्तर बातमी
मानवी मनाचा संपूर्ण परीघ आपल्या चेतनामयी काव्य गीतांमधून तितक्याच सजगतेने आणि सम्यकतेने कवेत घेणाऱ्या, निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांवर आधारित, या विशेष संगीत मैफिलीमध्ये प्रा. डॉ. संजय मोहोड यांच्या समूहाने बहिणाबाई चौधरी यांच्या विविध गीतांचे गायन करून वातावरण निर्मिती केली. या गीतांमध्ये पेरणी पेरणी, घरोटं -घरोटं माहेराला जाणं, मन वढाय वढाय, खोप्यामधी खोपा, सदा जगाच्या, नको लागू जीवा इत्यादी संगीत रचना सादर करण्यात आल्या. संगीतप्रेमी श्रोत्यांच्या सक्रिय उपस्थितीने या कार्यक्रमाला बहार आणली.
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न
या प्रसंगी प्रा. संजय मोहोड यांनी संगीत दिग्दर्शन आणि निवेदनाची जबाबदारी सांभाळली. गायक चमुमध्ये , मेधा लखपती, विद्या धनेधर, पुनम साबळे, वैष्णवी लोळे , प्रभू मते, निकिता कोलंबीकर, नितीन ससाणे, योगेश गच्चे हे होते. या चमूला साथसंगत करणाऱ्या कलावंत मंडळीत पंकज शिरभाते , गजानन धुमाळ, जगदीश व्यवहारे, निरंजन भालेराव, मिस्टर प्रिस्टली इत्यादींचा समावेश होता. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू विलास सकपाळ, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके , पंजाबराव अंभोरे आदींची उपस्थिती होती.
“संजय राऊतांनी शिवसेनेचं वाटोळ केलं…”, शिंदे गटाचा हल्लाबोल
(ज्ञानेश्वर ताले)