एमसी स्टॅन हा भारतीय रॅपर (MC Stan Indian rapper) असून तो एका गरीब कुटुंबामधील आहे. आता एमसी स्टॅनने ‘ बिग बॉस 16″ ची ट्रॉफी जिंकली आहे. त्या ट्रॉफीवर त्याने आपले नाव कोरले आहे. तर मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरे (Shiv Thackeray) हा फर्स्ट रनर अप ठरलाय.
“सापाला वाचवायला गेला अन् तरुणासोबत घडलं असं की….” पाहा VIDEO
रविवारी रात्री एका सोहळ्यामध्ये विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने या विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, एमसी स्टॅन आठवी मध्ये शिकत असतानाच त्याला रॅप साँगचे वेड लागले. नंतर त्याने रॅपरचे शिक्षण घेतले असून त्यातूनच पुढे एमसी स्टॅन हा रॅप साँग लिहायला लागला. नंतर हळूहळू तो प्रसिद्ध देखील झाला.
बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार मात्र पक्षाबाबत नाराजी कायम!
एमसी स्टॅनच्या कुटुंबबाबद्दल पहिले तर तो एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील रेल्वेमध्ये हवालदार आहेत. त्याची आई गृहिणी आहे. ते आधी पुण्यातील ताडीवाला रोडवर राहत होते मात्र आता ते मुंबईला (Mumbai) राहत आहेत. मात्र त्याच्या विजयानंतर ताडीवाला रोड भागात देखील जल्लोष करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराला सुरुवात