
बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये (Big Boss 16 ) रॅपर एमसी स्टॅनची चांगलीच चर्चा होती. परंतु,शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी यांपैकी कोणीतरी बिग बॉस 16 चे विजेतेपद पटकवणार असे म्हंटले जात होते. मात्र रॅपर एमसी स्टॅनने या सीझनचे विजेतेपद पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान एमसी स्टॅन या मूळचा पुण्याचा असून त्याच्याकडे सध्या लाखो रुपयांची संपत्ती आहे.
रानबाजार’मध्ये गुटखा खाण्याबद्दल प्राजक्ता माळीने केलं मोठं विधान; म्हणाली, “आत असलेला माल…”
एमसी स्टॅनचे ( MC stan) यापूर्वीचे आयुष्य वाचून मात्र तुम्हाला धक्का बसेल. कारण एक रॅपर व बिगबॉस चा विजेता म्हणून सर्वदूर प्रसिध्द झालेला एमसीस्टॅन पुण्याच्या झोपडपट्टीमध्ये लहानाचा मोठा झाला आहे. येथील मुलांसोबत राहून तू चुकीच्या मार्गाला सुद्धा लागत होता. याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
यावेळी एमसी म्हणाला की, ” माझ्या काही मित्रांसोबत राहून मलाही वाईट सवयी लागत होत्या. माझ्या घराच्या पाठीमागेच माझी शाळा होती. अजाना सुरू झालं की मी व माझे मित्र शाळेतून निघायचो. शाळा सुटायच्या आधीच आम्ही बाहेर पडायचो. शाळेमध्ये आमचे गुटखा खाऊन थुंकणं असे प्रकार सुरु असायचे. तेव्हा माझ्या कुटुंबियांकडे फारसे पैसेही नव्हते. झोपडपट्टीमध्ये राहत असल्याने सकाळी उठून आमचं काहीतरी वेगळंच सुरू असायचं. “
या पुढे त्याने सांगितले की, हे सगळं बघून आई-वडिलांनी मला आर्मी शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला. मलाही काही वाईट सवयी लागल्या होत्या. चोरी वगैरे असे प्रकार झोपडपट्टीमध्ये सुरू असायचे. परंतु, आई वडिलांच्या त्या निर्णयाने मी सुधारलो. सध्या एमसी स्टॅन एवढा यशस्वी आहे तो त्याच्या आईवडिलांनी योग्यवेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळेच !
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा, तरुणांनी पैशाची उधळण करताच पोलिसांनी केला लाठीचार्ज