
आग लागल्याच्या घटना सतत कुठे ना कुठे घडत असतात. सध्या अशीच एक आग लागल्याची धक्कादायक घटना लातूर या ठिकाणी घडली आहे. लातूरमधील (Latur) एका प्रसिद्ध मेडिकल स्टोअर्सला मध्यरात्री भीषण आग लागली असून आगीत लाखो रुपयांची औषधं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
गाडीवर स्टंट करत तरुणीला केले प्रपोज; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
घटना अशी घडली की, बंद असलेल्या मेडिकलमधून (Medical) अचानक धूर बाहेर येत होता. याबाबत तेथील बाजूच्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले नाही.
‘या’ नेत्याने घेतला सुप्रिया सुळेंच्या भोळेपणाचा फायदा! खोटे बोलून केली फसवणूक
आग इतकी भीषण होती की मेडिकलमधील सर्व औषधे जळून खाक झाली आहेत. मेडिकल स्टोअरच्या मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.