Meera Road Murder Case । मीरारोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती, शरीराचे तुकडे शिजवल्याने…

mira road saraswati vaidya death case

mira road saraswati vaidya death case । मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी मनोज साने याने विष पाजून त्याच्या लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले असल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत असून याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरस्वती वैद्य हत्या प्रकरणामधील रासायनिक पृथक्करण अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला आहे. यामध्ये सरस्वतीने कीटकनाशक प्राशन केले होते की नाही हे समजू शकलेले नाही. (Meera Road Murder Case)

Politics News । शरद पवार आणि अजित पवार गटासाठी धक्कादायक बातमी, आमदारांचे सदस्यत्व रद्द होणार?

आरोपी मनोज साने याने सरस्वती हिची हत्या करून तिचा मृतदेह शिजवला होते. त्यामुळे मृतदेह शिजवण्यात आल्याने व इतर कारणास्तव चाचणीत स्पष्ट काहीच समजू शकलेले नाही. त्यामुळे आरोपीच्या दाव्यानुसार सरस्वतीने स्वतःहून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली की, तिची हत्या करण्यात आली याचे गूढ अजूनही कायमच आहे.

VIDEO । भीषण अपघात! गाडी खोल खड्यात पडली, व्यक्तीला वाचवण्यासाठी मित्रांनी स्वतःचा जीव घातला धोक्यात; धक्कादायक व्हिडीओ समोर

सरस्वती वैद्य हीने स्वतःच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेला आपल्याला जबाबदार धरू नये म्हणून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून शिजवल्याचे अटकेत असलेल्या आरोपी मनोजने तपासात सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये एक कीटकनाशकाची बाटली देखील सापडली यानंतर पोलिसांना सरस्वतीने आत्महत्या केल्याचे सांगून मनोज दिशाभूल करीत असल्याचा संशय आला होता. यानंतर याची पडताळणी करण्यासाठी सरस्वतीच्या शरीराचे तुकडे रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

Iraq University Fire । विद्यार्थ्यांच्या किंचाळ्या, मोठ्याने आक्रोश, इराक विद्यापीठाच्या होस्टेलला भीषण आग, 14 जणांचा मृत्यू, 18 जणांची प्रकृती गंभीर

मागच्या काही महिन्यापासून पोलीस रासायनिक पृथक्करण अहवालाच्या प्रतीक्षेत होते. हा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. मात्र मृतदेह कुकरमध्ये शिजवण्यात आल्याने व कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यात कीटकनाशक प्राशन केल्याचे नमुने आहेत किंवा नाहीत हे काही स्पष्टपणे कळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Chhagan Bhujbal । छगन भुजबळ यांची इंदापूर मध्ये जाहीर सभा, दीड लाख ओबीसी बांधव येण्याचा अंदाज

Spread the love