मुंबई : काल शनिवारी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली.ही भेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झाली. ही बैठक साधारणपणे एक ते दीड तास चालू होती. पण बैठकीमागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. याआधी देखील उद्योगपती गौतम अदानी यांनी २० सप्टेंबरला (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
पीएम किसान लाभार्थ्यांची चिंता वाढली! 12 वा हप्ता दिवसेंदिवस लांबतोय, कारण…
मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्या या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. पण रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले. उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani ) यांनी २० सप्टेंबरला (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली होती. नंतर लगेच मुकेश अंबानींनी उद्धव ठाकरेंचे विरोधक एकनाथ शिंदेसोबत बैठक घेतली यामुळे या बैठकीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सातारा जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीवर लम्पी रोगाचा परिणाम, बैलांच्या बाजार आणि प्रदर्शनाला बंदी
उद्धव ठाकेर-गौतम अदानी यांच्यात बैठक
मागच्या काही दिवसात अदानी आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे देखील म्हटले जाते. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना धारावीच्या पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. ठाकरेंकडे सध्या सत्ता नसतानाही अदानी यांनी त्यांची घेतलेली भेट घेतली होती. याच कारणामुळे ही भेट चर्चेचा विषय ठरली होती.