Maharashtra Rain Update । मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने (Heavy Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांत नद्या-नाल्यांना पूर (Flood) आले आहे. यंदा जरी राज्यात दमदार पाऊस झाला असला तरी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच आता हवामान खात्याकडून (IMD) पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy Rain) पडू शकतो, या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे, रायगड, पुणे, सातारा, नागपूर, रत्नागिरी, भंडारा आणि गोंदियात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये आज इयत्ता पहिली ते 12च्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
Maharashtra Rain | पावसाचे थैमान सुरूच! अंगावर वीज कोसळून तिघांचा बळी
त्याशिवाय राज्यासाठी पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतील. कारण या दरम्यान, राज्यात पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस
हे ही पहा