Maharashtra Rain | पुणे : उशिरा का होईना पण राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain in Maharashtra) थैमान घातले आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत (Heavy Rain) झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत. अशातच आज पुन्हा हवामान खात्याने (IMD) काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
हत्या की आत्महत्या? घरात सापडले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह
हवामान खात्याकडून आज पुन्हा पुण्यासह पालघर, सातारा, ठाणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट (IMD Alert) जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर तुमचे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
चंद्रपुरात जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने येथील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मुंबई उपनगरांतही पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.