Site icon e लोकहित | Marathi News

अभिरूप युवा संसद स्पर्धेत एमजीएम प्रथम

अभिरूप युवा संसद स्पर्धेत एमजीएम प्रथम

औरंगाबाद : युवक बिरादारी संस्थेच्या वतीने बुधवारी रुख्मिणी सभागृहात आयोजित केलेल्या अभिरूप युवा संसद 2022 या विभागस्तरीय स्पर्धेत एम जी एम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयच्या विद्यार्थी संघाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. स्पर्धेतील द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ‘गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद’ ठरले असून तृतीय पारितोषिक एमजीएम विद्यापीठाच्या जी वाय पाथ्रीकर महाविद्यालयास मिळाले आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ यंत्रासाठी मिळणार कोटींचे अनुदान

स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक पुढील प्रमाणे आहेत.

प्रथम पारितोषिक – अकसा हरिम खान
द्वितीय पारितोषिक – यश घाटगे
तृतीय पारितोषिक – संभाजी चव्हान आणि साक्षी शर्मा

महत्वाची बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

एमजीएम विद्यापीच्या पत्रकारिता महाविद्यालयाचा संघ यावर्षी सलग चौथ्यांदा विभागस्तरीय स्पर्धेचा विजेता ठरला आहे. यावर्षीच्या स्पर्धेतील सादरीकरणात मेन्स ॲट्रॉसिटी अँड राइट्स ऍक्ट, रिलीजियस इक्वलिटी फोर वुमन, पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर एलजीबीटी क्यू अँड अमेंडमेंट अॅक्ट इन अँग्लो इंडियन अशा पद्धतीचे विधेयक सादर करण्यात आले.

बिहारमध्ये आहे चक्क आयआयटीयन्सचे गाव! इथल्या तरुण पोरांची ‘ही’ कमाल नक्की वाचा

युवकांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्याकरिता युवक बिरादारी च्या वतीने युवा भूषण , वसुंधरा बचाव अभियान , अभिरूप युवा संसद असे काही उपक्रम राबविलेली जातात.
संसद हे जनतेचे सभागृह आहे व जनता ही सार्वभौम आहे. स्पर्धेतील प्रत्येकच संघाचे सादरीकरण उत्तम होते. या सर्व स्पर्धकांमध्ये मी उद्याचे खासदार पाहतोय. असे मत स्पर्धेचे परीक्षक राज कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, युवक बिरादारीचे समन्वयक प्रशान्त वाघाळे, परीक्षक निहार देवरुखकर आणि राज कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

धक्कदायक! श्रीगोंद्यातील तरुणीची सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

” आम्ही एक टीम म्हणून UCC(समान नागरी संहिता) बिल 2022 ची ओळख करून दिली आणि चर्चा केली. या सहभागाद्वारे आम्ही lgbtq समुदाय आणि अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढला.अभियांत्रिकी विद्यार्थी असल्याने,संसदेच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती नव्हती. पण या सहभागातून आम्हाला कामकाजाची पद्धत कळली. एका संघातील प्रत्येक सहभागीसाठी हा एक अद्भुत अनुभव होता.”

स्पर्धक – हर्ष जाधव (शासकीय अभयांत्रिकी महाविद्याय औंगाबाद)

प्रतिनिधी: ज्ञानेश्वर ताले

Spread the love
Exit mobile version