‘बिग बाॅस ओटीटी 2’ शोची (Bigg Boss OTT 2) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोचे होस्ट यावेळेस करण जोहर (Karan Johar) नसून सलमान खान (Salman Khan) करताना दिसणार आहे. शोची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तशी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या शो संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मालिका पाहणार्या पत्नीने टीव्ही बंद करण्यास दिला नकार, पतीने केले भयानक कृत्य; वाचून हादराल
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी शोचा प्रोमो देखील प्रदर्शित केला आहे. आता सर्वांच्या नजरा स्पर्धक कोण असतील याकडे लागल्या आहेत. प्रत्येक आवड्याला भन्नाट टास्कच्या माध्यमातून शो हिट बनवण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. या शोच्या चाहत्यांसाठी एक धक्का देणारे स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. ते नाव दुसरं तिसर कोणाच नसून ॲडल्ट स्टार मिया खलिफाच (Mia Khalifa) आहे.
Sharad Pawar । शरद पवार धमकी प्रकरणी हाती लागली मोठी माहिती!
तसेच, कॉमेडियन कुणाल कामरा, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तसेच श्रीलंकन गायक योहानी यांना देखील शो यशस्वी करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. बिग बॉसनंतर कदाचित मिया खलिफालाही असेच काहीतरी हवे असेल. कारण तिने अॅडल्ट चित्रपट करणे बंद केले आहे. आता तिला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे. मियाचे जगभरातील चाहते या बातमीने खूप खूश आहेत. काही जण तिला बिग बॉस OTT वर बघण्यासाठी आतुरतेने डोळे लावून बसले होत.
Rain Update । राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पडणार मुसळधार पाऊस; यलो अलर्ट जारी…