भारत (India) हा कृषीप्रधान देश आहे. देशातील ग्रामीण भागात मुख्यतः शेती (Agriculture) व्यवसाय केला जातो. यामुळे देशातील बऱ्याच सामाजिक संस्था शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी विविध प्रकारचे संशोधन करत आहेत. दरम्यान पुण्यातील दोन अमेरीकन व्यक्तींनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलार पंप सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत होणार आहे. तसेच हा सोलार पंप (Solar Pump) वापरण्यास देखील अगदी सोप्पा व वजनाने हलका आहे.
Ajit Pawar | त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून अजित पवार संतापले; म्हणाले, अशा घटना…”
कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की या दोन अमेरिकन लोकांनी खेतवर्क (Khethworks) नावाने त्यांचे स्वतःचे स्टार्टअप (Startup) सुरु केले. हे स्टार्टअप खास भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करतात. भारतातील बहुतेक शेतकऱ्यांना शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी विजेची समस्या भासते.
सर्वात मोठी बातमी! २००० हजारांची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत
यावर उपाय म्हणून कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की यांनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलार पंप तयार केला. या प्रकल्पासाठी त्यांनी भारत सरकारकडूनआरखडा मंजूर करून घेतला. तसेच पेटेंट घेऊन पुणे शहरात युनिट उभे केले. यानंतर मायक्रो सोलार पंप सुरु झाला. खेतवर्क्सने आतापर्यंत ९०० पंपचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे.
‘केरला क्राइम फाईल्स’ वेब सीरिजचा जबरदस्त टीझर रिलीज; ‘हे’ कलाकार प्रमुख भूमिकेत