Site icon e लोकहित | Marathi News

अंबानींच्या एंगेजमेंट कार्यक्रमात १० मिनीट नाचायला मिकासिंगने घेतले ‘इतके’ कोटी रुपये

Mikasingh took 'so many' crores to dance for 10 minutes at Ambani's engagement event

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून अंबानी कुटुंब ओळखले जाते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( Anant Ambani) याचा साखरपुडा नुकताच पार पडला. राधिका मर्चेंट ( Radhika Marchent) या मुलीसोबत अनंतचा साखरपुडा पार पडला आहे.

भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश – शरद पवार

राजस्थान येथील आलिशान हॉटेल मध्ये पार पडलेल्या या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते. त्याचबरोबर संध्याकाळी गायक मिका सिंगने आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिका सिंगने या कार्यक्रमात फक्त 10 मिनिटांचा परफॉर्मन्स दिला, मात्र त्यासाठी त्याने तब्बल 1.5 कोटी रुपये शुल्क आकारले.

एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना टोला; म्हणाले,”त्यांच्या सारख्या नेत्यांनी असे बोलणे…”

दरम्यान, आंबानी कुटुंबाची सुनबाई राधिका ही भारतामधील प्रमुख व प्रसिद्ध औषध कंपनी एनकोर हेल्थ केअर चे सीईओ उद्योगपती वीरेन मर्चेंट व शैला मर्चेंट यांची मुलगी आहे. विशेष गोष्ट म्हणजे राधिका व अनंत हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. 18 डिसेंबर 1994 रोजी राधिकाचा जन्म झाला असून ती क्लासिकल डान्सर आहे. जवळजवळ आठ वर्षे तिने भरतनाट्यमचचे शिक्षण घेतले आहे. मुंबईच्या श्री निभा आर्ट अकादमीत गुरु भावना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.

पिंपरी विकास कामाकडे पिंपरी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

Spread the love
Exit mobile version