दुग्धव्यवसायाला चालना मिळण्यासाठी दूध संघटनेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Milk Association's Big Decision to Boost Dairy Industry; Read in detail

तुम्ही आतापर्यंत फिल्म फेस्टिव्हल, युथ फेस्टिव्हल किंवा फार फार तर ऍग्रो फेस्टीव्हल बद्दल पण ऐकले असेल. परंतु, कोल्हापूर येथे आता चक्क ‘डेअरी फेस्टिव्हल’ होणार आहे. दूध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने हा फेस्टिव्हल होणार आहे. ‘इंडियन डेअरी फेस्टिव्हल 2023’ ( Indian Dairy Festival 2023 ) असे या फेस्टिव्हलचे नाव असणार असून यामध्ये दूध व्यवसायासाठी लागणारे तंत्र, महत्त्व आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध संघ / संस्थांतर्फे 20 ते 22 जानेवारी 2023 दरम्यान इंडियन डेअरी फेस्टिव्हल होणार आहे. ‘नांदी नव्या धवलक्रांतीची’ असे घोषवाक्य यासाठी ठरविण्यात आले आहे. कोल्हापूरमधील ( Kolhapur) सयाजी हॉटेल येथे दूध परिषद व शाहूपुरी जिमखाना मैदानावर हा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे. याची माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी दिली आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या नवीन घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

“डेअरी व पशुधन क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या बळावर आर्थिक व गुणवत्तापूर्वक दूध उत्पादन व्हावे. दूध उत्पादनाच्या संकलनात आणि प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. यातून फायदेशीर पशुपालन व डेअरी उद्योग तयार व्हावा. हा विचार समोर ठेऊन हे फेस्टिव्हल होईल” , असे डॉ. चेतन नरके म्हणाले आहेत.

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; 205 किलो कांदा विकून हाती आले फक्त 8 रुपये!

दरम्यान या फेस्टिव्हल मध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा या राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ देखील सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील तरुणांनी दूध व्यवसायात सहभाग घ्यावा यासाठी या फेस्टिव्हल मध्ये विविध उपक्रम व चर्चा होणार आहेत. अडचणीत असलेला दूध व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी हे फेस्टिव्हल महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *