जगात वेगवेगळ्या व्यवसायांमधून (bussiness) मोठ्या प्रमाणावर पैशांची (money) उलाढाल होत असते. तसेच यामध्ये पाहिलं गेलं तर जगामध्ये (World) सर्वात मोठ्या तंत्रज्ञानात असणाऱ्या कंपनी ॲप्पल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीची मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल आहे. महत्वाची बाब म्हणजे या कंपन्यांच्या दुपटीने जगात दुग्धव्यवसायाची (Milk bussiness) उलाढाल असल्याचे सांगितले जात आहे.
धक्कादायक! बसचा अपघात होऊन एका मुलासह 11 जणांचा होरपळून मृत्यू
दुग्धव्यवसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. ग्रेटर नोएडा येथे वर्ल्ड डेअरी समीट 2022 ही पार पडली. या वर्ल्ड डेअरी समिटसाठी जगातील ज्यांचा दुग्ध व्यवसाय आहे त्या सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली होती. यावेळी आयफसीएन एजी जर्मनीचे सीईओ डॉ. टॉरस्टेन हेम म्हणाले की, डेअरीच्या उदयोग समूहाचा ग्राहक मूल्य जो आहे तो जवळपास 800 अब्ज डॉलर्सचा आहे.
पुणे-सोलापूर मार्गावर श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात! एक जण जागीच ठार
पुढे त्यांनी सांगितले की, 2014 ते 2019 या 6 वर्षाच्या कालावधित दूध उत्पादक शेतकऱ्याचा एकूण कमाई मधील 70 टक्के जास्त वाटा हा दूध कमाई मधून मिळणाऱ्या पैशातूनच आहे. तसेच यावेळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष मिनेश शहा म्हणाले की, विकसित आणि विकसनशील या दोन्ही देशामध्ये दुग्धव्यवसाय हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण जगातील एक अब्जपेक्षा जास्त लोक या व्यवसायावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
‘पुष्पा 2’मध्ये ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची होणार एंट्री
तसेच सध्या भारत देशाचा दुग्धव्यवसाय हा 13 ट्रीलियण एवढा आहे तर हा व्यवसाय 2027 पर्यंत जवळपास 30 ट्रीलीयन कडे जाईल. दरम्यान पद्दुचेरी मधील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक डॉ. एस.राजकुमार यांनी यावेळी या दुग्धव्यवसायमध्ये महिलांचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले आहे. कारण गाई व म्हशी पासून दूध उत्पादकता वाढवण्यात महिलांचा मोठा सहभाग असणे काळाची गरज आहे.
Devendra Fadanvis: राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार – देवेंद्र फडणवीस