पेट्रोल-डिझेल (petrol-diesel), घरगुती गॅस यांच्या सततच्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त आहे. आता गोकुळच्या (Gokul) दूध दरात देखील वाढ करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलीटर 3 रुपये इतकी वाढ केली आहे.
पाणीपट्टी थकल्यामुळे ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना थेट न्यायालयाची नोटीस; वाचा सविस्तर
याबाबत माहिती गोकुळ दूध (Milk) वितरण संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. गोकुळ दूध संघाने आत्तापर्यंत गाईच्या दूध दरामध्ये तीन महिन्यात दुसऱ्यांदा दरवाढ केली आहे.
17 डिसेंबरला सरकारविरोधात महाविकासआघाडीचा महामोर्चा
यामध्ये गायीच्या दूधामध्ये लिटरमागे 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दूध दर प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे. दूध दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत लागणार आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलाची यशाला गवसणी; MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन झाला PSI