Milk Rate । मागच्या काही दिवसापासून दुधाला भाव नसल्याने दुधाला दर मिळावे यासाठी अनेक शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. ठीक ठिकाणी आंदोलने देखील होत आहेत, या सर्व गोष्टी होत असतानाच आता पंढरपूर तालुक्या जवळ मोडनिंब येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या एक लिटर दुधाला जवळपास 98 रुपये 59 पैसे इतका दर मिळाला आहे.
Samruddhi Mahamarg Thane । समृद्धी महामार्गाचे काम चालू असतानाच घडली मोठी दुर्घटना! 17 जण जागीच ठार
मोडनिंब या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या म्हशीच्या एक लिटर दुधाला जवळपास 98 रुपये दर मिळाला आहे. स्वप्निल शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा आता सगळीकडे होत आहे.
कोणत्या दूध संकलन केंद्रात मिळाला दर?
शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा दर अमूल दूध संकलन केंद्रात मिळाला आहे. म्हशीच्या दुधाला इतका दर मिळाल्यामुळे हा शेतकरी आणि त्याचे कुटुंब आनंदित आहे. या कुटुंबाने आपला आनंद व्यक्त करण्यासाठी म्हशीला पेढे भरून तिचे कौतुक केले त्याचबरोबर तिच्या शिंगाला फुगे बांधले आहेत.
मोठी बातमी! ऑगस्टमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागच्या काही दिवसापूर्वी दुधासाठी 34 रुपये दर निश्चित केला होता. मात्र 34 रुपये दर निश्चित करूनही तो दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकरी दुधाला दर मिळावा यासाठी सातत्याने आंदोलने करत आहेत. सध्या देखील दूर दरावरून आंदोलन चालूच होते आता यादरम्यानच म्हशीच्या दुधाला 98 रुपये दर मिळाल्याने याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. (Milk Rate)