Site icon e लोकहित | Marathi News

मनाला सुन्न करणारी घटना, रुग्णालयाच्या छतावर सापडले 500 मृतदेह; शरीराचे अवयवही झाले गायब

Mind-numbing incident, 500 dead bodies found on hospital roof; Body parts also disappeared

पाकिस्तानमधून (pakistan) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पाकिस्तानमधील पंजाब निश्तर हॉस्पिटलमध्ये (Punjab Nishtar Hospital) 500 बेवारस मृतदेह सापडले आहेत. इतकं भयानक म्हणजे सर्व मृतदेहांच्या (dead body) छाती उघडल्या गेल्या असून त्यांचे अवयव काढण्यात आले आहेत. दरम्यान या पाकिस्तानी प्रशासनाने घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ निश्तर मेडिकल युनिव्हर्सिटीच्या निश्तर हॉस्पिटलमधून समोर आला होता. या व्हिडिओमध्ये (video) उघड्यावर मृतदेह दाखवण्यात आले होते. हे विकृत मृतदेह हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर आणि जुन्या लाकडी खाटांवर फेकण्यात आले होते.

Rohit Pawar: बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढं यावं – रोहित पवार

दरम्यान निश्तार हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकांना एका अधिकाऱ्याने पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटल आहे की, “मुलतानच्या निश्तर हॉस्पिटलच्या टेरेसवर मृतदेह कुजण्याची एक भयानक घटना समोर आली आहे. ज्यामुळे लोकांमध्ये संताप आणि भय निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अमूल दूध दरात प्रतीलिटर ‘इतक्या’ रूपयांनी वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका!

दरम्यान, याचवेळी मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. इतकंच नाही तर मृतदेह चुकीच्या पद्धतीने हाताळणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले.पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निश्तर हॉस्पिटलच्या मृतदेहांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी दक्षिण पंजाबच्या आरोग्य विभागाने सहा सदस्यांची टीम तयार केली आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन टप्प्यात वितरित होणार चार हजार कोटी रुपये, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Spread the love
Exit mobile version