Site icon e लोकहित | Marathi News

Shambhuraj Desai: मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा घेतला आढावा, म्हणाले…

Minister Shambhuraj Desai reviewed the Lumpy outbreak in Satara district, said…

मुंबई : देशासह महाराष्ट्र राज्यात देखील लम्पी चर्म रोगाने (Lumpy skin disease) धुमाकूळ घातला आहे. दरम्यान राज्यात सातारा जिल्ह्यात (Satara District) लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन (animal husbandry) व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी दिले.

Ajit Pawar: “महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे” – अजित पवार

मंत्री देसाई यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यात लम्पी चर्म रोग प्रादुर्भावाबाबत सद्यस्थितीचा आढावा घेतला.यावेळी ते म्हणाले की, लम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे.

तसेच ज्या गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याचे समजताच तात्काळ भेट देऊन पशुधनास उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. महत्वाचं म्हणजे लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल अस देखील मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. पुढे मंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असे आवाहन केले.

आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.? हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिलेल पत्र व्हायरल

मंत्री देसाई यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार ,सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले. दरम्यान सातारा जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे.

Rohit Pawar: “…म्हणून तरुणांच्या रोजगाराची संधी हुकली”; महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून रोहित पवारांची प्रतिक्रिया

Spread the love
Exit mobile version