
MLA Ganpat Gaikwad | सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्व परिसरामध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिमन्यू गायकवाड यांचे कल्याण तिसाई चौकामध्ये कार्यालय आहे. या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टोळक्याने कार्यालयात शिरून कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा तपास करत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी गोळीबाराच्या घटनेने राज्याचे लक्ष वेधले होते आणि यामध्येच आता अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या वादाला पण राजकीय किनार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पार्किंग वरून वाद झाल्यानंतर चार ते पाच जणांनी मिळून कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयामधील काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची देखील माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास कल्याण कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
Sangli Accident । क्षणात होत्याच नव्हतं झालं..! कारच्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू