MLA Ganpat Gaikwad । आमदार गणपत गायकवाड यांनी भर कोर्टात एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप; नेमकं काय घडलं कोर्टात?

Ganpat Gaikwad

MLA Ganpat Gaikwad । भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट भर कोर्टात गंभीर आरोप केले आहेत.

Ganpat Gaikwad । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी

नेमकं काय म्हणाले गणपत गायकवाड?

कोर्टामध्ये हजर करण्यात आल्यावर गणपत गायकवाड म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. ज्या वेळी घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी माझा मुलगा नव्हता. मात्र पोलिसांनी माझ्या मुलाला आरोपी बनवून त्याला अटक केली आहे. असं सांगतानाच माझ्या सारख्या माणसाला कायदा का हातात घ्यावा लागला? असा प्रश्न गणपत गायकवाड उपस्थित यांनी केला.

Sharad Pawar । लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “शिंदे बाप-लेकाने माझ्यावर अन्याय केला आहे. मी देवेंद्र फडणीस यांना वारंवार सांगितलं. मात्र त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केलं. असं गणपत गायकवाड यांनी कोर्टामध्ये म्हटल आहे.

Ganpat Gaikwad Firing । आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा थरकाप उडवणारा गोळीबाराचा व्हिडीओ

Spread the love