Mla Ganpat Gaikwad । मुंबईच्या उल्हासनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. हिललाईन पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. सध्या महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (BJP Mla Ganpat Gaikwad Firing)
Mahesh Gaikwad News । महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट
याबाबत बोलताना भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले, “महेश गायकवाड यांनी पोलीस स्टेशन बाहेर शेकडो मुलं जमा केली होती. ते माझ्या मुलाच्या अंगावर धावून आले. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही म्हणूनच मी गोळीबार केला. असं आमदार गायकवाड यांनी सांगितलं. त्याचबरोबर, जर माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला कोणी काय करत असेल तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. असं देखील आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटल आहे”.
एकनाथ शिंदे यांच्यावर केले गंभीर आरोप
“माध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कल्याण पूर्वेत शिंदे बाप-लेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. त्याचबरोबर दुसरीकडे मी केलेल्या कामाचे क्रेडिट श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव शिंदे यांनी आखला होता. असं गायकवाड यांनी माध्यमांसमोर म्हटले आहे”.
BJP Mla Firing । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार