अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरावस्थेमुळे अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसांपासून आमदार निलेश लंके हे आमरण उपोषणासाठी बसले होते.
Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेची तब्बेत खालावली
दरम्यान, आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री.अजितदादा पवार यांनी उपोषण स्थळी भेट घेत व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, नॅशनल हायवे अथोरिटी चे चीफ इंजिनिअर शेलार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या समवेत चर्चा करत माहिती घेतली व थेट अजित दादा पवार यांनी बांधकाम खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली असता नितीन जी गडकरी यांनी रस्ता पूर्ण करण्याचा शब्द दिला असून हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज श्रीगोंदा दौऱ्यावर; ‘असा’ असेल दौरा
यावेळी आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी चे नेते श्री.घनश्याम आण्णा शेलार, मा.जिल्हाध्यक्ष श्री.दादाभाऊ कळमकर,श्री.क्षितिज घुले,श्री.शिवशंकर राजळे व इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होती.
“…अन् त्या लहान मुलाचा जागीच मृत्यु झाला”; वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला धक्कादायक प्रकार