
कर्जत : कर्जत-जामखेडचे (Karjat-Jamkhed)आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे नेहमी जनतेसाठी कुठल्याही परिस्थितीत मदतीला धावून जातात. रोहित पवार यांची एक संवेदनशील, तत्पर व कृतिशील ‘लोकप्रतिनिधी ‘ म्हणून राज्यात ओळख आहे. रोहित पवार निरनिराळ्या माध्यमातून आपत्तीच्या (disaster) निवारणासाठी काम करतात. दरम्यान आता पुणे जिल्ह्यात लंम्पी चर्मरोगाचे (Lumpy skin disease) संकट समोर आले आहे. हा संसर्ग वाढू नये याकरिता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
Shinde-Fadnavis: ओबीसी शिष्यवृत्ती बंद! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पण लसीच्या तुडवड्यामुळे कर्जत-जामखेड मधील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये म्हणून आमदार रोहित पवार यांनी स्वतः व बारामती ॲग्रो च्या माध्यमातून कर्जत जामखेड करिता एक लाख लस उपलब्ध करून दिल्या आहेत. हे लसीकरण करण्यासाठी सरकारी यंत्रणेसह आणखी काही बाहेरचे खाजगी डॉक्टर या कार्यात योगदान देणार आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मधील जनतेशी स्वतः मोबाईलद्वारे संपर्क साधून दिली. तसेच काही मार्गदर्शक सूचना केल्या.
Varun Sardesai: “उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील या भीतीने भाजपाने शिवसेना फोडली” – वरूण सरदेसाई
आमदार रोहित पवार म्हणाले , “ लंम्पीची लागण न झालेल्या सर्व जनावरांना प्रतिबंधात्मक लस देऊन काळजी घ्यावी. या लसीकरणासाठी सरकारी व खाजगी डॉक्टरांचे पथक दोन्ही आणि बाहेरचे काही सेवाभावी डॉक्टर तालुक्यात कार्यरत आहे. तसेच लंम्पी चर्मरोग जनावरांना होऊ नये; म्हणून या प्रतिबंधात्मक लसीचा उपयोग होत असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लस देऊन घ्यावी. तसेच ज्या जनावरांना लम्पीची लागण झाली आहे, त्या जनावरापासून अन्य पशुधनापासून दूर ठेवावे. तसेच जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता ठेवावी. तसेच गोठ्यात गोचीड, डास होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी. ,” असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
Dadar: दादरमध्ये शिवसेना विरुद्ध शिंदे गटात राडा, गोळीबारात एक पोलीस जखमी