
मुंबई : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे ते काहीही बोलतात असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर “शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत, असा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे.
Tanaji sawant: तानाजी सावंत ऍक्शन मोडमध्ये, ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर व्यक्त केली नाराजगी
उद्धव ठाकरेंचे समर्थक दोन आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता यावर उत्तर देत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “आमच्याकडचं कोणताही आमदार शिंदेगटात जाणार नाही. पण याउलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करतायेत . शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार शिवसेनेमध्ये परत येणार आहेत”.
दरम्यान भुमरे म्हणाले होते की, शिवसेनेतील अजून दोन आमदार फिटणार आता हे दोन आमदार कोण? यावर चर्चाना उधाण आलय. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असलेल्या आमदारांची संख्या जास्त कमी आहे. त्यात आता अजून दोन आमदार शिवसेनेतून फुटणार म्हंटल जातंय. यावर चंद्रकांत खैरेंनी भुमरेंना गावठी मंत्री असल्यामुळे ते काहीही बोलतात असं म्हणत तिखट शब्दात टीका केली आहे.