MNS । मुंबई : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. कधीही निवडणूक आयोग (Election Commission) निवडणुका जाहीर करू शकते. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. (Latest marathi news)
मनसेचे माथाडी कामगार सरचिटणीस महेंद्र जाधव, सरचिटणीस सुमंत तारे, उपाध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्यासह तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त माथाडी कामगार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपुवी हा राज ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
आज मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबारहिल मधील आनंदवन बंगल्यावर माथाडी कामगारांचा हा पक्ष प्रवेश पार पडणार असून यावेळी मंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यापूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Manoj Jarange Patil । मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली