
MNS । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे कामगार नेते गजानन राणे यांच्या कार्यकर्त्यांची आणि मनसे पदाधिकाऱ्यांची भररस्त्यात हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Maharastra Politics । ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?
या हाणामारीमध्ये काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याची देखील मिळत आहे. अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिराच्या सुमारास चांदीवली परिसरात हा वाद झाला आहे. मात्र या वादामुळे मनसेचा अंतर्गत वाद समोर आल्याचे दिसत आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी कामगार नेते गजानन राणे त्या ठिकाणी उपस्थित होते. मारहाण करणारे कार्यकर्ते हे राणे यांचे असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र आर्थिक व्यवहारातून ही हाणामारी झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. स्थानिक मनसे पदाधिकारी गजानन राणे आणि मारहाण झालेली व्यक्ती यांच्यामध्ये जुना वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी राणे काल त्या व्यक्तींना भेटण्यासाठी गेले. यावेळी भेटीदरम्यान बाचाबाची झाली आणि हा वाद टोकाला गेला. त्यामुळे गजानन राणे यांच्या साथीदाराने सदर व्यक्तीस बेदम मारहाण केली.
Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वीच ठाकरेंचा भाजपला जबरदस्त धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश