
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (udhav Thakarey) यांनी आज पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. ती महत्वाची घोषणा म्हणजे शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (sambhaji brigade) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. आता यावर मनसे आमदार राजू पाटील (raju patil) आणि मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावलाय.
खोका, मोका आणि धोका! सामनातून शिवसेनेने गद्दार म्हणत केली जहरी टीका
राजू पाटील यांनी एक खोचक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…” या युतीनंतर शिवसेनेवर भाजपकडून जोरदार टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्लाबोल केलाय.
सत्तेविना मती गेली,
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 26, 2022
जो मिळेल त्याच्याशी युती केली…!#Maharashtra
त्याचबरोबर मनसे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी देखील ट्विट करत खोचक टोला लगावलाय. ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, “ए ग्रेड ‘ठाकरी’ राजकारणाला सोडचिठ्ठी. बी ग्रेड ‘आखरी’ राजकारणाशी हातमिळवणी. मऱ्हाठा ते मराठा… विचारांशी नाळ जुळलेलीच नसेल तर अत्यंत वेगाने युती/आघाडीसाठी झेड ग्रेडपर्यंत येतील! येतील म्हणजे यायचंच!! किंबहुना, पोहोचायचंच” असे ट्विट करत सडकावून टीका केली आहे.
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा ऐतिहासिक पराक्रम, डायमंड लीगचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला
ए ग्रेड 'ठाकरी' राजकारणाला सोडचिठ्ठी.
— कीर्तिकुमार शिंदे (@KirtikumrShinde) August 27, 2022
बी ग्रेड 'आखरी' राजकारणाशी हातमिळवणी.
मऱ्हाठा ते मराठा…
विचारांशी नाळ जुळलेलीच नसेल तर अत्यंत वेगाने युती/आघाडीसाठी झेड ग्रेडपर्यंत येतील!
येतील म्हणजे यायचंच!!
किंबहुना, पोहोचायचंच!!!