
खालापूर येथील इर्शाळवाडी या ठिकाणी घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मोठी दरड कोसळून इर्शाळवाडी गावावर कोसळली. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या गावामध्ये 40 ते 45 घरं असून गावातील फक्त पाच ते सहा घरं वाचली आहेत. आणि या संकटामधून फक्त दहा ते बारा गावकरी वाचले आहेत.
या घटनेमुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज घटनास्थळी जावून ग्रामस्थांसोबत बातचित केली. यावेळी ग्रामस्थांनी रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगत असताना नाना पटोलेंसमोर टाहो फोडला.
अतिशय भयानक दुर्घटना! संपूर्ण गावावर कोसळली दरड, 60 जण अडकले ढिगाऱ्याखाली
तेथील ग्रामस्थांनी अंगावर काटा आणणारा रात्रीचा प्रसंग सांगितला, यावेळी बोलताना ग्रामस्थ म्हणाला, “ मी झोपलेलो होतो. माझ्या बाजूच्या भिंतीला धक्का बसला. यानंतर मला जाग आली. मी एका खोलीत एकटा झोपलो होतो. आणि माझ्या शेजारच्या खोलीत दादा वाहिनी आणि त्यांची दोन लहान मुले होती. मी त्यांच्याकडे धावत गेलो. तेवढ्यात वरील दरड कोसळली. असं म्हणत ग्रामस्थाने नाना पटोले यांच्यासमोर टोहा फोडला.