देशात अजूनही काही लोक गरिबीचा सामना करत आहेत. कित्येक लोक बेघर होऊन रस्त्याच्या कडेला राहताना आपण पाहतो. यामध्ये त्यांची लहान मुले।देखील असतात. यामध्ये लहान मुलांचे शैक्षणिक आणि शारीरिक नुकसान होत असते. यावर उपाय म्हणून फिरते पथक हा नवीन प्रकल्प राज्यात सुरू होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याकडेला राहणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या वयोगटाप्रमाने आहार व शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. ही मदत देण्यासाठी एक बस ( Bus for homelss children) फिरणार आहे. रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू राहणार आहे.
आनंदाची बातमी! शुक्रवारपासून जनावरांचे बाजार सुरू होणार
महिला व बालविकास विभागाने ( women & Child development Department) हा निर्णय घेतला असून मुंबई, मुबंई उपनगर, मुंबई शहर, ठाणे व नागपूर या जिल्ह्यांतील बालकांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने सहमती दिली आहे. तसेच तब्बल 50 लाखांचा निधी देखील मंजूर झाला आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का; संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणारा साक्षीदार शिंदे गटात!
सहा महिन्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार असून जिल्ह्यात ज्या ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी नऊ ते सायंकाळी दहा या वेळेत फिरत्या पथकाची बस फिरणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये बस फिरणार आहे त्या ठिकाणी २५ मुलांच्या क्षमतेची बालस्नेह बस उपलब्ध करून त्यावर महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत फिरते पथक असे लिहिलेले असावे. तसेच या बसला सीसीटीव्ही कॅमेरा आणि ट्रॅकिंग प्रणाली असणे गरजेचे आहे. प्रत्येक बससाठी एक समुुपदेशक, शिक्षक, चालक आणि काळजीवाहक या चार कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करावी. त्यातील दोन कर्मचारी महिला असाव्यात. अशा सूचना या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आल्या आहेत.
गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होणार? अनेक संघटनांकडून होतीये मागणी