Mobile Tips : आपण मोबाईल घेताना कितीही चांगला मोबाईल घेतला तरी तो खाली पडल्यानंतर त्याचा डिस्प्ले हा जातोच. बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत हा प्रकार घडतो मोबाईल खाली पडून त्याचा डिस्प्ले जातो. यामुळे अनेकजण डिस्प्ले बदलण्याचा कंटाळा करतात. अनेक असे लोक आहेत ते क्रॅक असलेले किंवा तुटक्या डिस्प्लेचे स्मार्टफोन वापरतात. ज्यावेळी जास्त खराब होईल त्यावेळी डिस्प्ले टाकू असा अनेक जणविचार करत असता. त मात्र तुम्ही देखील असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Kirit Somaiya । किरीट सोमय्या उतरले पुन्हा मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
तुम्ही देखील तुटलेल्या स्क्रीनचा फोन वापरत असाल तर तुमच्या स्मार्टफोनसाठी आणि तुमच्याही आरोग्यासाठी हे घातक ठरू शकते. त्यामुळे तुटलेला डिस्प्ले लवकरात लवकर बदलून घेण्यातच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही खराब डिस्प्ले तसाच वापरत असाल तर तो आणखी खराब होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मोबाईल टचपॅड वर देखील याचा मोठा परिणाम होतो.
मोबाईल मध्ये जाऊ शकते धूळ
जर तुम्ही देखील तुटलेल्या स्क्रीनचा फोन वापरत असाल तर यामध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये धूळ जाऊ शकते. त्यामुळे या धुळीमुळे मोबाईलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या स्मार्टफोन मधून ब्ल्यू लाईट निघत असते ही लाईट देखील आपल्या डोळ्यांना खूप धोक्याची असते. आणि आपला जो डिस्प्ले असतो तो या लाईटवर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो. मात्र डिस्प्ले फुटल्यामुळे ही लाईट डायरेक्ट आपल्या डोळ्यावर येते त्यामुळे आपल्याला डोळ्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.