Site icon e लोकहित | Marathi News

Modi Government | अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला धरले धारेवर ! उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले, मोदी सरकारला एवढा अहंकार…

PC- Facebook

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आज ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ‘मातोश्री’ येथे भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची देखील भेट घेण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या तिन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी तिघांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

Mumbai | खळबळजनक! मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणू; महाराष्ट्र पोलिसांना ट्विटरवर टॅग करत अज्ञाताकडून धमकी

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीमध्ये आमचं सरकार बनलं आणि काहीच दिवसांत केंद्र सरकारने आमच्या अधिकार हिरावून घेतले. त्यांनी आमच्या अधिकारांवर घाला घातला. मात्र ८ वर्ष दिल्लीकरांनी सुप्रीम कोर्टात लढाई लढली. ८ वर्षांनी सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण या निर्णयानंतर अवघ्या ८ दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमचे अधिकार पुन्हा हिसकावले. मोदी सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला मानत नाही.

Break Up | ब्रेकअप मधून बाहेर पडण्यासाठी वापरा ‘या’ पाच सोप्प्या टिप्स !

मोदी सरकारमधील मंत्र्यांनी आणि नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत. हे लोक न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर वेगवेगळ्या मोहीमा राबवतात. यांचे लोक निवृत्त न्यायाधीशांना देशद्रोही म्हणतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. आता हे म्हणतायत की, सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उलथवून टाकू, अशी त्यांची भूमिका आहे. हे लोक जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडतात, आमदार खरेदी करतात, त्यांच्या मागे ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावतात. जर यांना इतकाच अहंकार असेल तर मग हे लोक निवडणुका घेतातच कशाला. असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी यावेळी उपस्थित केला.

Honda SUV | होंडाची नवीन एसयूव्ही लवकरच लाँच होणार ; बाजारात यायच्या आधीच गाडीचे बुकिंगही झाले सुरू !

Spread the love
Exit mobile version