मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय! CNG आणि PNG गॅसच्या किंमतींमध्ये ‘इतक्या’ रुपयांनी कपात होणार…

Modi government has taken a big decision! CNG and PNG gas prices to be reduced by Rs.

मागील काही महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यातच CNG आणि PNG गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. परंतु CNG आणि PNG च्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे CNG आणि PNG गॅस चे दर कमी होऊ शकतात.

ट्रॅफिक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, बंद पडलेल्या ट्रकला दिला धक्का; पाहा Video

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर इम्पॅक्ट! शासकीय निवासस्थानावरील अतिखर्चिक पाहुनचाराला लावली कात्री

PNG आणि CNG गॅसच्या किंमती घटणार आहेत. याच बरोबर नैसर्गिक वायूच्या किंमतीची निश्चितता करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे 2014 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. यामुळे 2 वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात 8.57 डॉलर‌ इतकी किंमत वाढली आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याप्रमाणे, सुधारित घरगुती गॅस किंमतीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे की, उत्पादकांना बाजारातील प्रतिकूल चढउतारांपासून संरक्षण देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाची बातमी! पुण्यातील ‘हा’ रोड दोन दिवस असणार बंद

मुंबईत CNG गॅस 5 रुपये तर PNG गॅस आठ रुपयांनी कमी होणार आहे. CNG गॅसची किंमत बंगळुरूमध्ये 6 रुपये तर PNG गॅसची किंमत 6.50 रुपये याप्रमाणे कमी होणार आहे. त्याचबरोबर पुण्यात CNG आणि PNG गॅसच्या किमतीत पाच रुपयांनी कपात होणार आहे.

“एक्स गर्लफ्रेंड पाहून जळत असेल” आकाश ठोसरच मोठ वक्तव्य

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *