Site icon e लोकहित | Marathi News

Narendra Modi: मोदी सरकारचा देशवासीयांना मोठा दिलासा! ‘या’ योजनेची वाढवली मुदत

Modi government is a big relief to the countrymen! Extended term of 'Ya' scheme

दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) कोरोनाच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana) या नावाने ही योजना सुरू केली होती. दरम्यान या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो मोफत रेशन (Free ration) दिले जाते. केंद्र सरकारने जनतेला मोफत रेशन देणाऱ्या योजनेची मुदत अजून तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

MPSC: एमपीएससीकडून तीन महिने आधीच 2023च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कारण…

मोफत रेशन योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच सरकारने अजून तीन महिन्यांनी वाढवली आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कारणांमुळे कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर 45,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सध्या सरकारकडे धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या अगोदर मोफत रेशनची योजना आता बंद होईल, अशी चर्चा होती.

Prajakta Mali: “…त्याचा प्रवास तर फारच ह्रदयाजवळचा आहे”, प्राजक्ता माळीची ती इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

खरतर केंद्र सरकारने शिल्लक धान्याच्या साठ्याचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे येत्या काळात गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून या योजनेची तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Devendra Fadnavis: पीएफआय’वर भारतात बंदी! देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत केला मोठा खुलासा, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version