
फक्त भारतातच नाही तर जागतिक स्थानावर देखील नरेंद्र मोदी सुप्रसिद्ध आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि युकेचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्यासह इतर 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकून नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत.
मोठी बातमी! अदानींची शेअर मार्केट मधून हाकलपट्टी; वाढते नुकसान पाहून NSE ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या ( The Morning consult survey) सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी मोठ्या अप्रुव्हल रेटिंगने या यादीत स्थान मिळवले आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदींचे अप्रुव्हल रेटिंग 78 टक्के आहे.
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे’ म्हणत तरुणाने दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्येच घातला राडा
याच यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे अप्रुव्हल रेटिंग 40 टक्के आहे. यामुळे ते सातव्या स्थानावर आहेत. मागील वेळी ते 11 व्या स्थानावर होते. दरम्यान या यादीत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक हे 16 व्या स्थानावर आहेत.
अन् गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी हातात घेतली काठी, पुढे काय झाले हे वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
‘मॉर्निंग कन्सल्ट’ने दिलेली ही माहिती 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानची आहे. या काळातील रेटिंग त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे या यादीत ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा 50 टक्के रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत.
ट्रान्सजेंडर जोडप्याच्या घरी येणार नवा पाहुणा; लवकरच होणार आई-बाबा