मुंबई : काल शनिवारी (17 सप्टेंबर) मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नामिबियाहून (Namibia) 8 चित्ते आणण्यात आले आहेत. विशेष बोईंग ७४७-४०० विमानाने चित्त्यांचे (cheetahs) आगमन झाले. ग्वाल्हेरहून त्यांना श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळ पालपूरला आणले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सकाळी ११.३० वाजता पिंजऱ्याचे दार उघडून तीन चित्त्यांना सोडले. तर उर्वरित पाच चित्ते इतर मान्यवरांनी सोडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी या ठिपकेदार चित्त्यांची छायाचित्रे एका व्यावसायिक कॅमेऱ्यातून टिपली.
Heart Attack: शरीरावर ‘ही’ लक्षण जाणवतात? सावधान येऊ शकतो हार्टअटॅक
यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्री भुपेंदर यादव होते.
दरम्यान तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्र टिपतनाच्या फोटोला छेडछाड करण्यात आलेला एक फोटो ट्विटरला शेअर केला. आणि यावरून नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान या प्रकारानंतर भाजपनेही त्यावर प्रत्युत्तरही दिलं.
‘या’ कारणाने वासरांची वाढ खुंटते; घ्या अशा प्रकारे काळजी
तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर करताना म्हटलं की, “सर्व आकडेवारीवर झाकण ठेवणं ही एक गोष्ट आहे, परंतु कॅमेऱ्याच्या लेन्सवर झाकण ठेवणे ही निव्वळ दूरदृष्टी आहे”. दरम्यान लगेचच
भाजपाने हा फोटो खरा नसल्याचं सिद्ध करत प्रतिक्रीया दिली आहे.
भाजपा नेते सुकांता मजुमदार यांनी फोटोमध्ये केलेली छेडछाड दाखवून दिली. मजुमदार यांनी मोदींनी ज्या कॅमेऱ्यातून छायाचित्र टिपले तो निकॉनचा कॅमेरा असून कॅनॉनचं कव्हर दिसत असल्याचं लक्षात आणून दिलं.
TMC Rajya Sabha MP is sharing an edited image of Nikon camera with canon cover.
— Dr. Sukanta Majumdar (@DrSukantaBJP) September 17, 2022
Such a bad attempt to spread fake propaganda. @MamataOfficial ..hire someone better who can atleast have common sense. https://t.co/rPgNb3mmM0
यानंतर पुढे सुकांता मजुमदार म्हणाले की,“तृणमूलचे राज्यसभा खासदार निकॉनच्या कॅमेऱ्यावर कॅनॉनचा कव्हर असणारा एडिटेड फोटो शेअर करून खोटा प्रचार करण्याचा किती हा वाईट प्रयत्न आहे. ममता बॅनर्जींनी किमान थोडी माहिती असणाऱ्यांना तरी कामावर ठेवावं,” असा टोला लगावत प्रतिउत्तर दिले आहे. दरम्यान यानंतर काही वेळातच तृणमूलचे खासदार जवाहर यांनी नरेंद्र मोदींबाबत छायाचित्रबाबत केलेले ट्वीट डिलीट केलं.