Moeen Ali : मोईन अलीने सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले, पण युवराज सिंगच्या विक्रमापासून राहिला लांब

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंड संघाने 6 बाद 234 धावा केल्या. टी-20 मधील ही इंग्लंडची दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. वेगवान फलंदाजी करताना मोईनने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले. मोईनने 18 चेंडूत 52 धावांची खेळी खेळली. तर 21 वर्षीय ट्रिस्टन स्टब्सने दक्षिण आफ्रिकेकडून 28 चेंडूत 72 धावा केल्या. यादरम्यान या युवा फलंदाजाने 8 षटकार ठोकले.

इंग्लंड चा स्टार फिरकी अष्टपैलू मोईन अलीने बॅटने फटकेबाजी करताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. मात्र, एकूण विश्वविक्रमात तो अजूनही युवराज सिंगपासून लांबच राहिला.

मोईन अलीने (Moeen Ali) 27 जुलै रोजी ब्रिस्टल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. फलंदाजी करताना मोईनने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले. मोईनने 18 चेंडूत 52 धावा केल्या.

मोईनच्या आधी हा विक्रम लियाम लिव्हिंगस्टोनच्या (Liam Livingstone) नावावर होता. लियामने 17 चेंडूत अर्धशतक ठोकले. पण आता मोईनने त्याचा विक्रम मोडला असून तो इंग्लंडसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *