Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar : मोहित कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे नाही, निंबाळकरांनी सांगितला ‘तो’ बडा नेता कोण ?

Mohit Kamboj's cash is not with Ajit Pawar, Nimbalkar said who is 'that' big leader?

मुंबई : मागील दोन तीन दिवसांपूर्वी सिंचन घोटाळा प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सलग एकापाठोपाठ पाच ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनील देशमुख (Anil Deshmukh) यांना लवकरच भेटायला जाणार म्हणजेच तुरुंगात जाणार असल्याचे म्हटले होते.तसेच त्यांनी ट्विटमध्ये सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता.

बेनामी कंपन्या, प्रेयसीच्या नावावरची संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे. त्यांच्या या एकापाठोपाठ केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.या ट्विट मुळे सर्वांचा रोख अजित पवारांकडे (Ajit Pawar) जात होता.

दरम्यान, आता माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की,मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्या नेत्याबाबत हे ट्विट केले आहे, तो नेता अजित पवार नसून दुसराच असल्याचा गौप्यस्फोट निंबाळकर यांनी केला आहे. लवकर ही माहिती समोर येईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बडा नेता कोण असावा असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Spread the love
Exit mobile version