आपण नेहमी ऐकत असतो की मुक्या प्राण्यांना जीव लावला पाहिजे. पण लातूरमध्ये अशी एक धक्कादायक घटना घडली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. लातूरमधील सोनखेड भागात पाच दिवसापासून माकडाने (Monkey) दहशद निर्माण केली आहे. या माकडाने गावातील जवळपास ५० पेक्षा जास्त लोकांना जखमी केले आहे. यामुळे तेथील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक थेंब दुधाच्या थेंबालाही किंमत मिळणार; वाचा, शासनाचा नवीन निर्णय
या माकडामुळे घरातून बाहेर देखील कुणी पडत नाही. आता या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाची टीम दाखल झाली आहे. पण या माकडाला पकडण्यात वनविभागाची टीम देखील अपयशी ठरत आहे. हे माकड कोणाच्याच हाती लागत नाही. या माकडाने वन विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला केला आहे.
झुंड चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली अटक; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावामध्ये अनेक माकडांच्या टोळ्या आहेत. पण आतापर्यंत यांनी फक्त शेतीच नुकसान केलं आहे. मात्र यावेळी तर एक माकड लोकांवर हल्ला करत आहे. माकडाच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत ५० हुन अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.