आपण बऱ्याचदा भारतात (India) खोदकाम करताना जमिनीखाली खजिना मिळाल्याचा अनेक घटना ऐकल्या आहेत. दरम्यान अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बदाऊनमध्ये (Badaun) घडली आहे. घटना अशी घडली की, बदाऊनमध्ये मोडकळीस आलेले घर (Home) पाडण्यासाठी पालिकेकडून बुलडोझर चालवण्यात आले होते. दरम्यान यावेळी भिंत फोडून काढताना (Breaking through the wall) त्या ठिकाणी चांदीच्या नाण्यांचा (silver coins) पाऊस पडल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
सरकारचा महत्वाचा निर्णय! देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार; वाचा सविस्तर
चांदीची नाणी भिंतीत पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेव्हा भिंतीतून चांदीची नाणी पडत होती, त्यावेळी
घटनास्थळी उपस्थित लोकांनी ही नाणी लुटण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घराला नाकाबंदी करण्यात आली.
खुशखबर! जमीन खरेदीसाठी मिळतंय शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर
पालिकेकडून अस सांगण्यात आले की, सततच्या पावसामुळे हे जुने घर कोसळण्याच्या मार्गावर आले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी या घराला पाडण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी भिंत पाडली असता तेथे चांदीची नाणी सापडली. या नाण्यांमध्ये एका नाण्याचे वजन सुमारे 10 ग्रॅम असून बाजारात त्याची किंमत एक हजार रुपये आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या भिंतीतून तब्बल 160 हून अधिक चांदीची नाणी बाहेर आली आहेत. दरम्यान प्रशासनाने चांदीची नाणी जमा केली आहेत.
Viral Video: जिमच्या इक्विप्मेंटवरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी