मुंबई : काल बुधवारी शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. यामध्ये शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर झाला तर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवतीर्थावर झाला. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खूप वेळ भाषण केले. यावेळी भाषण सुरू असताना निम्म्याहून अधिक लोक निघून गेल्याची चर्चा आहे. अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) देखील हा आरोप केला आहे.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, “त्याला हार्ट अटॅक…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाषण वेळेपेक्षा जास्त वेळ चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांना उशीर होत असल्यामुळे त्यांनी सभेतून काढता पाय घेतला. शिंंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) परराज्यातून माणसे आणल्याची जोरदार चर्चा होती. त्याचबरोबर त्याचे व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान ठाकरेंच्या प्रत्येक टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
मोठी बातमी! मुकेश अंबानी आणि निता अंबानींना जीवे मारण्याची धमकी
तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली. या टीकेला प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदे म्हणाले, “खरे गद्दार कोण? आम्ही गद्दार नव्हे, तुम्ही गद्दार आहात. खरंतर तुम्हीच साहेबांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. निर्णय घेताना आम्ही आनंदाने घेतला नाही, आम्हाला देखील वाईट वाटलं. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा”.
Mumbai: डोंबिवलीत आगीत होरपळून आईसह दोन मुलींचा मृत्यु, समोर आल धक्कादायक कारण