सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर पहाटेचा शपथविधी सतत चर्चेत आहे.
या शपथविधीबाबत शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं होत. शरद पवार म्हणाले होते की, “पहाटेच्या शपथविधीचा एकच फायदा झाला की राष्ट्रपती राजवट राज्यातून उठली”. शरद पवार यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. यामध्येच आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना अजून एक आव्हान दिलं आहे.
अभिनेत्री ह्रता दुर्गुळेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; पोस्ट शेअर करत म्हणाली…
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहाटेच्या शपथविधीचा एकच फायदा झाला की राष्ट्रपती राजवट राज्यातून उठली”. असं पवारांनी वक्तव्य केलं मात्र मी त्यांना एकच विचारू इच्छितो त्यांनीच हे स्पष्ट करावं की महाराष्ट्रात त्यावेळी राष्ट्रपती राजवट का लागली? कोणाच्या मागणीवरून राष्ट्रपती राजवट लागली? त्याचबरोबर राष्ट्रपती राजवट लावण्यापाठीमागे कोण होतं? याचा सविस्तर खुलासा शरद पवार यांनीच करावा असं आव्हान फडणवीसांनी शरद पवारांना दिलं आहे. आता यावरून शरद पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘मशाल’ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टानं दिला मोठा निर्णय