Site icon e लोकहित | Marathi News

कपल फोटोशूटसाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Mother-in-law helped for couple photo shoot! You will also be amazed by the video

सासू-सून म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर काय येत? घरातली वादावादी, भुणभुण, भांड्यांची आदळाआपट आणि नुसता गोंधळ! मागील अनेक वर्षांपासून हे नाते असेच आहे. सासू म्हणजे अगदी खाष्ट बाई… सुनेचा छळ करणारी, तिला बरे-वाईट बोलणारी, भरपूर काम लावणारी आणि सून म्हणजे सासूला पटवून न घेणारी, काम न करणारी अशी अनेक विशेषणे सासू-सुनांसाठी वापरली जातात. परंतु, आता काळ बदलतोय तशी सासू- सुनेच्या ( Daughter in Law) नात्याची व्याख्या देखील बदलत आहे.

Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! फॅमिली प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत

याचे उदाहरण म्हणजे नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ. ( Viral Video) आजकालच्या कपल्सचे फोटोशूट हे कुटुंबातील व्यक्तींसमोर होत नाही. त्यातल्या त्यात सासू-सासरे तर त्या ठिकाणी नसतातच. मात्र, या व्हिडीओ मधील फोटोशूट मध्ये चक्क सासूबाई सुन फोटोत छान दिसावी यासाठी प्रयत्न करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे फोटोशूट बीच वर सुरू आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मविआ नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध!

या व्हिडीओमध्ये फोटो काढताना सासू आपल्या सुनेची ओढणी हातात घेताना दिसत आहे. एवढेच नाही तर आपला मुलगा व सुनेसाठी त्या वेगवेगळ्या पोझ देखील सुचवत आहेत. विशेष म्हणजे सून देखील सासूच्या सुचना अगदी काळजीपूर्वक ऐकत आहे. या व्हिडीओमधील मोठा ट्विस्ट म्हणजे खुद्द सासरेच सुनेचे व लेकाचे फोटो काढत आहेत. हे पाहून व्हिडीओ बघणाऱ्या लोकांच्या भुवया आश्चर्याने वर उंचावल्या आहेत.

“…गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा”, नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Spread the love
Exit mobile version