गावातील ग्रामपंचायत निवडणुका या अतिशय रंजक असतात. याकाळात होणाऱ्या कुरघोड्या, प्रचार आणि दंगा पाहण्यासारखा असतो. दरम्यान राज्यात ग्रामपंचायत निवडणुका (Grampanchayat Election) लागल्या आहेत. गावागावांत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच गोंदिया जिल्ह्यातील बोदरा देऊळगावच्या (Bodra Deulgaon) ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये चक्क सासू विरुद्ध सून अशी लढत लागली आहे. यामध्ये एकाच घरातील दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सासू-सून आहेत. यामुळे राज्यात या गावाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
“…अन्यथा चित्रपटगृहांना आग लावू; शाहरुखचा ‘पठाण’ वादाच्या भोवऱ्यात, महंतांनी दिला इशारा
त्याच झालंय असं की, बोदरा देऊळगावात येत्या 18 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या गावाची लोकसंख्या 1650 इतकी असून गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या गावात जवळपास 15 वर्षानंतर अनुसूचित जाती महिला सरपंच ( Woman Sarpanch) पद राखीव झाले आहे. त्यामुळे देऊळगाव येथे सरपंचपदासाठी थेट सासू- सुनेत लढत होणार आहे.
“हसावे का रडावे कळत नाही…”, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
या निवडणुकीत मंदा योगीराज ढवळे (सासूबाई) या ‘सर्व धर्म समभाव’ पॅनल तर्फे सरपंचपदासाठी निवडणुकीत उभ्या राहिल्या आहेत. तर, त्यांच्याविरोधात त्यांच्याच सुनबाई किरण मिलिंद ढवळे यांनी अपक्ष सरपंचपदासाठी अर्ज भरला आहे. किरण या मंदा यांच्या चुलत दिराच्या सुनबाई आहेत. या दोघींचाही गावात दांडगा प्रस्त असल्याने ही लढत रंजक होणार आहे. दरम्यान दोघींनीही अगदी जोमात प्रचार सुरू केला आहे.