
Jayant Savarkar । ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन (Jayant Savarkar passes away) झाले आहे, ते ८८ वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात (Marathi Cinema World) कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली असून मराठी मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
सावरकर यांनी मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केले आहे. मागील चार दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. शंभरपेक्षा जास्त मराठी नाटकांमध्ये आणि ३० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान देखील भुषविले होते.
Monsoon session । रोहित पवार भर पावसात एकटेच बसले आंदोलनाला, केली ‘ही’ मागणी
दरम्यान, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत काम केले होते. तसेच ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये देखील काम केले होते. आता त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी शोक व्यक्त करत आहेत.