भारतीय क्रिकेट संघातील एका महत्त्वाच्या खेळाडूच्या मृत्युने क्रीडा विश्वात खळबळ माजली आहे. भारताचा युवा गोलंदाज सिद्धार्थ शर्मा ( Siddharth Sharma) याचे गुरुवारी ( दि.12) निधन झाले आहे. वयाच्या फक्त 28 वर्षी सिद्धार्थचा मृत्यु झाल्याने क्रिकेट विश्वात सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थने दोन दिवस लघवी होत नसल्याची तक्रार केल्याने त्याला 2 जानेवारीला वडोदरा ( Vadodara) येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शिक्षकांना ‘सर’ ‘मॅडम’ संबोधने होणार बंद; सरकारचा मोठा निर्णय!
मात्र त्याच्या प्रकृतीमध्ये कसलीच सुधारणा न झाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. सिद्धार्थच्या मृत्युमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असून केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुद्धा ट्विट करत सिद्धार्थ शर्माला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू व वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा यांच्या निधनाने धक्का बसला आहे. सिद्धार्थ हा आश्वासक खेळाडू होताच, पण त्याचबरोबर सांघिक भावना ही त्याची खासियत होती.’ असे ट्विट अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांनी केले आहे.
पुणे शहराच्या नामांतराबाबत अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
यासोबतच सिद्धार्थच्या कुटुंबातील लोकांना त्याच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. अशी प्रार्थना देखील अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्विट मध्ये केली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सिद्धार्थ व्हेंटिलेटरवर होता. सिद्धार्थ शर्मा मल्टिपल ऑर्गन फेल्युअर मुळे मरण पावला असल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात सांगितले आहे. परंतु, अधिकृत अहवाल अजूनही उपलब्ध झालेला नाही.
मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा घेणार निवृत्तीची
सिद्धार्थ शर्माच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्याने एक T20, सहा प्रथम श्रेणी सामने आणि 6 लिस्ट A सामन्यांमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र टीम इंडियासाठी तो आतापर्यंत खेळू शकला न्हवता.