देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election) पार पडणार आहे. या पार्शवभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) हे दिल्लीत दाखल झाले. यावेळी या ठिकाणी एक महत्वाची बैठक पार पडली.
आशा भोसले यांनी अमृता फडणवीसांना दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाल्या, “व्हॉइस मॉड्युलेशन व सराव…”
या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, के सी वेणुगोपाल यांच्याबरोबर काही दिग्गज नेते उपस्थित होते. ही बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील सर्व विरोधकांना एकत्र येऊन भाजपविरोधात सामना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या दिल्लीमधील बैठकीत घेण्यात आला सर्वात मोठा निर्णय
नरेंद्र मोदी (Narendr Modi) यांचा सामना करण्यासाठी तृणूमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी त्याचबरोबर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यासोबत देखील संवाद साधला जाणार आहे. या बैठकीनंतर शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी या तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीमध्ये या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
“मला लहान म्हणताय, मग मी मोठा झालो तर… “, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर पलटवार
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सर्वांना सोबत घेऊन आम्हाला देशाचा विकास करायचा आहे. देश वाचवण्यासाठी आम्ही विरोधक एकत्र आलो आहोत. आम्ही सर्व मोदींविरोधात एकजूट होऊन लढणार आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल! पाहा Video
Stronger, together !
— Mallikarjun Kharge (@kharge) April 13, 2023
We stand united for a better, brighter and an equal future for our people.
Along with Shri @RahulGandhi ji met @NCPspeaks President, Shri @PawarSpeaks ji and had a discussion on the future course of action. pic.twitter.com/EIMPtA15cM