Supriya Sule: राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची अमित शहांकडे मागणी

MP Supriya Sule demands Amit Shah to provide Z Plus security to NCP MLAs

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 17 ऑगस्ट पासून सुरु झालं आहे. पहिले चार दिवस विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.यामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा (Declaration)दिल्या. दरम्यान आज सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांच्या टीकेला उत्तर देत लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के, वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के अशा घोषणा देण्यात आल्या.

Eknath Shinde: पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने घेतले शेती क्षेत्राशी संबंधित महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

एकमेकांविरोधात घोषणा या धक्काबुक्कित बदलल्या.आणि आमदारांमध्ये राढा निर्माण झाला.या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule)यांनी ट्विट करत थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शहांकडे (Amit shaha)या घटनेची तक्रार केली आहे.

”गृहमंत्री अमित शहा जी, शिंदे गटाचे आमदार महाविकासा आघाडीच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सुरक्षेला असलेला वाढता धोका पाहून शिंदे गटाच्या लोकांच्या या वृत्तीवर कारवाई करावी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी आमदारांना सुरुक्षा पुरवण्याची विनंती आहे.

Eknath Khadse: अधिवेशनात झालेल्या आमदाराच्या राढयावर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

तसेच महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करावी आणि परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवावीत. असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्य़े लिहीले आहे.

आमदारांमध्ये धक्काबुक्कीच्या घटनेनंतर दोन्ही गटातील आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही झाले.यावेळी “आम्ही जे केले नाही ते आरोप विरोधकांनी केले. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही,” असे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले.

VIDEO : ‘गोमी-गोमी, गोमी’ गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडिओ पाहून पडताल प्रेमात

तसेच एकनाथ खडसे यांना देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली.यावेळी खडसे म्हणाले की, विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे.निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *