भारतीय कृषी अनुसंधान परिषद व राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थान माळेगाव बारामती यांच्या पंधराव्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शेती संबंधित उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच मा. श्री वासुदेव काळे प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे यांनी शेतकरी बांधवासाठी उल्लेखनीय काम केल्याबददल त्यांना “किसान मित्र” पुरस्काराने सन्मानित केले.
“संज्या तू लवकरच सामान्य लोकांकडून फटके खाणार”, निलेश राणेंचे ट्विट चर्चेत
प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन. मोफत माती परिक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या. शेतमालाची उत्पादकता वाढविण्यासाठी विकसित कृषी तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन खुल्या मार्केटची स्थापना केेली.आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी कृषी प्रदर्शन आयोजीत करून त्याद्वारे आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले. उच्च प्रतीच्या भरड धान्याचे बियाणे उपलब्ध करून देऊन प्रसार करणे तसेच त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
अशा प्रकारे शेतकरी बांधवासाठी काम केल्यामुळे त्यांना भारतीय कृषी अनुसंधान व संशोधन संस्थेनकडून किसान मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कृषी अनुसंधान व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. रेड्डी, डॉ. कुऱ्हाडे, डॉ. गांधी, डॉ. तायडे, डॉ. निर्मले व इतर मान्यवर उपस्थित होते.
आई श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी कपूर भावूक; फोटो शेअर करत म्हणाली…