
Mrunal Divekar । मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडिया स्टार असून ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या विनोदी व्हिडिओ मुळे सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. ती अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते. नुकतीच मृणालने एक मुलाखत दिली असून तिने लहान असताना तिच्यासोबत घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला आहे. (Mrunal Divekar videos)
तिच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंग सांगताना मृणाल म्हणाली, “मी लहान असताना ट्युशन लावल होत यावेळी माझा होमवर्क झालेला नव्हता म्हणून मला ट्युशन टीचर ने लग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरी-चौथीमध्ये होते. मी दोन तीन वेळा होमवर्क केला नव्हता त्यामुळे ट्युशन टीचरने माझ्यासोबत असं केलं होतं. त्याचबरोबर मृणालने गप्पा मस्ती पॉडकास्टमध्ये तिच्या शाळेतीलही काही अनुभव सांगितले आहेत.
त्याचबरोबर मृणाल म्हणाली, मी आधी कराडला शिक्षण घेत होते त्यानंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी शिकण्यासाठी गेले मात्र या दोन्ही शाळेमध्ये मला खूप फरक जाणवला. दोन्ही ठिकाणी वागणुकीमध्ये खूप तफावत असल्याच मृणाल म्हणाली आहे. ज्यावेळी मी कराडमध्ये होते त्यावेळी मला खूप अडचणी येत होत्या. त्या ठिकाणी खूप तुच्छतेने वागणूक दिली जात होते. तेथील शिक्षक देखील मारायचे वाचता नाही आलं, गणित सोडवता नाही आलं तर खूप अपमान करायचे असं मृणालने सांगितलं.
त्याचबरोबर इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्यावेळी मी गेले त्यावेळी जी मुलं नाटक किंवा खेळात चांगली होती त्यासाठी वेगळ सेक्शन बनवलं गेलं होतं. कारण तुम्हाला जे जमतं ते करा असं तेथील शिक्षकांचे म्हणणं होतं. त्यामुळे मुलांची कौशल्य विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी खूप फरक होता. त्यामुळे एखाद्या मुलाला जर लिखाणाची, वाचनाची आवड नसेल तर त्यामध्ये दुसरे गुण चांगले असतील तर त्याला एक्सप्लोर करायला लावणे यात आपले शिक्षक व शिक्षण पद्धती कमी पडत आहे असं मृणालने सांगितले आहे.
Manoj Jarange Patil । गावकऱ्यांच्या आग्रहाखातर जरांगे पाटलांनी घेतली सलाईन, आज घेणार मोठा निर्णय