MS Dhoni Jersey । मोठी बातमी! सचिन पाठोपाठ धोनीची 7 नंबरची जर्सी कायमची निवृत्त करण्याचा BCCI चा निर्णय

MS Dhoni Jersey

MS Dhoni Jersey । 7 नंबरची जर्सी (Number 7 jersey) म्हटलं की अगदी लहान मुलाच्या डोळ्यासमोर भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू एमएस धोनी (MS Dhoni) आल्याशिवाय राहत नाही. धोनीच्या नेतृत्वात अनेक सामने भारतीय संघाने जिंकले. धोनीने सात नंबर वापरण्यामागे आतापर्यंत अनेक कथा जोडल्या गेल्या. परंतु, हा नंबर म्हणजे त्याची जन्मतारीख होय. त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International cricket) रामराम ठोकला आहे. (Latest Marathi News)

Deepika Padukone । रणवीर सिंह नाही तर दीपिकाला ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई, अभिनेत्रीनेच केला मोठा खुलासा

त्याच्या निवृत्तीला तीन वर्ष झाली आहेत. अशातच आता BCCI एक मोठा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने (BCCI) 7 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून (Indian teams) खेळत असताना 7 नंबरची जर्सी घालून खेळता येणार नाही, असे BCCI ने स्पष्ट केले आहे. (MS Dhoni Jersey Number)

Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, याआधी बीसीसीआयने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर भारतीय क्रिकेटर शार्दुल ठाकुर 10 नंबरची जर्सी घालून मैदानावर उतरायचा, त्यामुळे बीसीसीआयने या विषयावर चर्चा करून त्यांनी शार्दुल ठाकुरला आपला जर्सी नंबर बदलायला सांगितलं आणि त्यानंतर सचिनचा जर्सी नंबर निवृत्त केला.

Mumps Galgund । मुंबईकरांनो वेळीच सावध व्हा, शहरात पसरलीय गालगुंडची साथ

Spread the love